चिपळूण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभरात लागल्यानंतर हातभट्ट्यांवर पोलिसांच्या धाडी पडत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत धगधगणाऱ्या हातभट्ट्या, जुगार, मटक्याचे अड्डे पोलिसांनी लक्ष्य केले आहेत. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी हे बेकायदेशीर धंदे नव्हते की काय? किंवा ते पोलिसांना का दिसले नाहीत? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. पोलिसांनी कायमस्वरूपी या धाडी सुरू ठेवाव्यात, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
तालुक्यातील पोलिस ठाणेअंतर्गत असणाऱ्या हातभट्टीच्या भट्टयांवर पोलिसांतर्फे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू गाळताना आरोपींना रंगेहाथ पकडले जात आहे. कुजके रसायन, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, भांडी, नवसागर, काळा गूळ आणि गाळलेली दारू पोलिस जप्त करीत आहेत व या प्रकरणी गुन्हेदेखील दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायमस्वरूपी या हातभट्टयांवर धाडी टाकाव्यात आणि कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा पोलिसांमार्फत प्रत्येक सर्वसामान्यांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 25/Oct/2024












