चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर नगरसेवक पदासाठी १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज (मंगळवारी) या अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे ३ तर नगरसेवक पदाचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र देवळेकर (ठाकरे शिवसेना), विनिता सावर्डेकर (अपक्ष), लियाकत शाह (काँग्रेस) या तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ८ उमेदवार राहिले आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. १ (ब) मधून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशा कदम, दीपक निवाते, प्रभाग क्र. २ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मुनीर सहिबोले, प्रभाग ३ (ब) मधून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कादीर मुकादम, प्रभाग ४ (अ) मधून नितीन गोवळकर, प्रभाग ५ (ब) मधून शिंदे शिवसेनेच्या सुवर्णा साडविलकर, प्रभाग ६ (ब) मधून महमूद पाते (शरद पवार राष्ट्रवादी), प्रभाग ११ (अ) मधून शरद पवार राष्ट्रवादीच्या युगंधरा शिंदे, प्रभाग ११ (व) मधून शिंदे शिवसेनेचे अंकूश आवले, प्रभाग ११ (ब) मधून काँग्रेसचे सुधीर शिंदे यांचे उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी ही छाननी केली.
पदासाठी ८ उमेदवार…
उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवार निशिकांत भोजने, काँग्रेसचे लियाकत शाह, तसेच सुधीर शिंदे, शरद पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, ठाकरे शिवसेनेचे राजेश देवळेकर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिलिंद कापडी आणि शिंदे शिवसेनेचे उमेश सकपाळ तर समाजवादी पार्टीचे श्री. पेचकर यांचे उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरले आहेत. आता चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १२९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. २९ नोव्हेंबरपर्यंत यातील कोण माघार घेते यावर बरेच राजकारण अवलंबून आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 19/Nov/2025














