रत्नागिरी : खेड रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेत चढत असताना वृद्धेच्या हातातील सोन्याची तब्बल १ लाख ४५ हजारांच्या बांगडी लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरीची ही घटना ११ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. अभिजीत जितू पवार (२७, रा, रूम नं. ५१६, हनमान मंदीर रोड, हनुमान मंदीरच्या मागे, सुभाषवाडी, अंबरनाथ (प), जि. ठाण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यानेच हा गुन्हा त्याचा मित्र निलेश गायकवाड, (रा. भवानी चौक, अंबरनाथ) यांचेसह संगनमताने केला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली १४ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबत फिर्यादी रंजना वामन पालंडे (६९, राह. दहिसर, मुंबई) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, त्या दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.२० वा सुमारास खेड रेल्वे स्टेशन फलाट क्र. १ वर आलेल्या गाडी नं. १०१०६ सावतंवाडी दिवा एक्स्प्रेस गाडीत चढत असताना ही घटना घडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 19/Nov/2025














