Ratnagiri : ‘नशामुक्त भारत घडवू’ जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली प्रतिज्ञा

रत्नागिरी : भारताला अमली पदार्थमुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमाचा भाग म्हणून समाज कल्याण कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली.

‘मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करेन, इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू, अशी प्रतिज्ञा घेतली.’

याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे आदी उपस्थित होते. समाजकल्याण निरीक्षक अमोल पाटील यांनी ही शपथ सर्वांना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 19/Nov/2025