Khed : लोटे एमआयडीसी परिसरात लोखंडी सळी घेऊन संशयास्पद फिरणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

खेड : लोटे एमआयडीसी परिसरातील तलारीवाडी गुणदे फाटा रस्त्यावर सोमवारी रात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास घडली. पोलीस नाईक अशोक विठ्ठल मुंडे (वय ३३) यांच्या माहितीनुसार, आरोपी चंदन उरांव (१९, सध्या रा. लोटेमाळ, ता. खेड, मूळ रा. पतराटोली पुरीय, जि. रांची, झारखंड) हा हातात लोखंडी सळी घेऊन रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना दिसला.

पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता, तो पळून जाऊन एस. आय. ग्रुप कंपनीच्या गेटजवळ अंधारात लपला. त्याचा शोध घेऊन पकडले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडून लोखंडी सळी मिळाल्याने आणि पेट्रोलिंगदरम्यान तो चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्याची वेळ २२.३७ वाजता अशी आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाणे करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 19/Nov/2025