दापोली : कृषी भूमिकन्या गटाकडून भात कापणी प्रात्यक्षिक

वेळवी : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे कृषी भूमिकन्या गटाच्या विद्यार्थिनींकडून राजाराम वनगुले यांच्या भात शेतीमध्ये वैभव विळा वापरून भात कापणीविषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, केंद्रप्रमुख डॉ. जगदीश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. सचिन पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकासाठी जयेश हुमणे, सुकोंडीचे सरपंच रमेश हुमणे, गावच्या महिला अध्यक्ष राजश्री वनगुले यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 25/Oct/2024