Ratnagiri: मतलई वाऱ्यांचा मासेमारीला फटका

रत्नागिरी : उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगवान वारे वाहू लागल्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळासदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्यामुळे मासेमारी करणे कठीण झालेले आहे. मच्छीमारी नौकांनी जवळच्या बंदराचा व खाड्यांचा आधार घेतलेला आहे. त्याचा फटका मासळीला बसला असून माशांचे दर वधारलेले आहेत.

गेल्या काही दिवसात वातावरणात सतत बदल होत आहेत. गेले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर अचानक वेगवान वारे वाहू लागलेले आहेत. या वाऱ्याचा फटका मासेमारी नौकांना बसलेला आहे. समुद्र खवळलेला असून लाटांचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या शंभरहून अधिक नौका रत्नागिरीतील बंदरात दाखल झालेल्या आहेत. ४०० नौकांनी हर्णे तर जयगड खाडीत १५० नौका उभ्या आहेत. शंभरहून अधिक नौका आंजर्ले खाडी सुरक्षेसाठी दाखल झालेल्या आहेत. पुढील दोन दिवस असेच मच्छीमारांना शांत रहावे लागणार आहे. सकाळी व सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढत आहे नौका बंदरात उभ्या असल्यामुळे मासळी मिळणे दुरापास्त झालेले आहे. मतलई वाऱ्यामुळे खवय्यांसह बाजारातील मासळी विक्री करणाऱ्या महिलांनाही फटका बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 20-11-2025