प्रभाग ९ मध्ये प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ; शिल्पा सुर्वे यांना मतदारांचा ‘हाऊसफुल्ल’ पाठिंबा

➡️ रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराने आता मोठा वेग घेतला आहे. यातच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांना शहराच्या प्रत्येक भागातून आणि प्रभागातून मतदारांचा उदंड आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

◼️प्रभाग ९ मध्ये प्रचाराचा नारळ फुटला
आज शहरातील प्रभाग क्रमांक ९ (Ward No 9) मध्ये विधिवत नारळ फोडून प्रचाराचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे उमेदवार विजय खेडेकर (Vijay Khedekar) आणि सायली पाटील (Sayali Patil) यावेळी उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. जयघोषाच्या नादात आणि प्रचंड उत्साहात या प्रभागातील प्रचाराला सुरुवात झाली आहे.

◼️”घरातील उमेदवार” अशी आपुलकीची वागणूक
शिल्पा सुर्वे जेव्हा प्रचारासाठी विविध प्रभागांमध्ये फिरत आहेत, तेव्हा त्यांना मतदारांकडून मिळणारी वागणूक ही केवळ एक ‘राजकीय उमेदवार’ म्हणून नसून ‘आपल्या घरातील व्यक्ती’ अशी असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग ९ मधील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मतदारांशी थेट संवाद, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची तळमळ आणि विकासाची दृष्टी यामुळे सुर्वे यांच्याबद्दल जनमानसात विश्वास निर्माण झाला आहे.

विजय खेडेकर आणि सायली पाटील यांनीही यावेळी प्रभागाच्या विकासाचा संकल्प बोलून दाखवला. एकूणच, नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता शिल्पा सुर्वे आणि त्यांच्या पॅनलची बाजू भक्कम होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 20/Nov/2025