श्री क्षेत्र गावखडी ते अक्कलकोट ‘मनोरथपूर्ती महापदयात्रा’ आजपासून; भक्तांसाठी २० वर्षांची अखंड परंपरा

गावखडी (रत्नागिरी) / प्रतिनिधी: कोकणातील हजारो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गावखडी (Ratnagiri) येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ‘श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी ही पदयात्रा यंदा आपल्या २० व्या वर्षात पर्दापण करत असून, या सोहळ्याला शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ पासून प्रारंभ होत आहे.

मठाधिपती श्री गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही भव्य पदयात्रा संपन्न होणार आहे. तब्बल १८ दिवस चालणाऱ्या या पायी वारीमध्ये कोकण, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून स्वामी नामाचा गजर होणार आहे.

असा असेल पदयात्रेचा १८ दिवसांचा प्रवास (Padyatra Route)
श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी येथून २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचा सविस्तर मार्ग आणि मुक्काम खालीलप्रमाणे आहे:

२१ नोव्हेंबर: गावखडी मठ (प्रारंभ) – मुक्काम: गोळप

२२ नोव्हेंबर: रत्नागिरी – मुक्काम: हातखंबा

२३ नोव्हेंबर: नाणीज – मुक्काम: करंजारी

२४ नोव्हेंबर: दाभोळे – मुक्काम: साखरपा

२५ नोव्हेंबर: आंबा – मुक्काम: मलकापूर

२६ नोव्हेंबर: बांबवडे – मुक्काम: पैजारवाडी

२७ नोव्हेंबर: कोल्हापूर (पंचगंगा नदी घाट) – मुक्काम: मार्केट यार्ड, कोल्हापूर

२८ नोव्हेंबर: हातकणंगले – मुक्काम: निमशिरगाव

२९ नोव्हेंबर: मिरज – मुक्काम: भोसेगाव

३० नोव्हेंबर: कुची – मुक्काम: शेळकेवाडी

०१ डिसेंबर: जुनोनी – मुक्काम: उदनवाडी

०२ डिसेंबर: सांगोला – मुक्काम: आंधळगाव

०३ डिसेंबर: गणेशवाडी – मुक्काम: माचणुर

०४ डिसेंबर: सोहाळे – मुक्काम: कामती खुर्द

०५ डिसेंबर: तीऱ्हे – मुक्काम: सोलापूर

०६ डिसेंबर: कुंभारी – मुक्काम: तोगराळी

०७ डिसेंबर: कोन्हाळी – मुक्काम: कोन्हाळी

०८ डिसेंबर: श्री क्षेत्र अक्कलकोट (पोहोच)

सांगता सोहळा आणि महाप्रसाद
अक्कलकोट दर्शन झाल्यानंतर ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ही पदयात्रा पुन्हा श्री क्षेत्र गावखडी येथे परतणा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 21-11-2025