मेष – आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल.
वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल.
वृषभ – आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल.
मिथुन – आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही.
कर्क – आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका.
सिंह – आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई – वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल.
कन्या – आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील.
तूळ – आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल.
वृश्चिक – आज आपण तन – मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्या निमित्त बाहेर जावे लागेल.
धनु – आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो.
मकर – आजचा दिवस नोकरी – व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल.
कुंभ – आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी – व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल.
मीन – आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 21-11-2025














