संगमेश्वर : फुणगुस बाजारपेठ ते मांजरेफाटा हा मुख्य मार्ग सध्या दाट झाडीच्या विळख्यात अडकला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली झाडी अक्षरशः रस्त्यावर आली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, वाहतूक करताना वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी व शेतकरी ये-जा करतात; मात्र झाडीमुळे दृष्टीआड झाल्याने अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी तर रस्त्याची रुंदी कमी झाल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, अशी स्थानिकांची नाराजी आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधून तत्काळ झाडी छाटणी करून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही कोणतीच हालचाल न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन झाडी काढून टाकल्यास अपघाताचा धोका टळेल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 21-Nov-2025









