संगमेश्वर : तेरेमुरलीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : टपरीवर चहा पिण्यासाठी गेलेल्या तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वैभव चंद्रकांत सुतार (वय ३२, रा. तेरेमुरली, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा खबर देणार यांच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. त्याने मद्यप्राशन केले होते. तेथील कडप्यावर डोके टेकून बसला असता त्याला उलट्या झाल्या. खबर देणार यास आपली तब्येत बरी नसल्याचे वैभवने सांगितले. तत्काळ त्याने वैभवच्या नातेवाईक उदय चंद्रकांत पांचाळ यांना बोलावून घेतले. प्रथम त्याला खासगी डॉक्टरकडे नेले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 25-10-2024