देवरुख : खड्डे चुकविण्याच्या नादात देवरुख ते काटवली सायलेदरम्यान रिक्षा चालकाचा अपघात होता होता टळला. रिक्षा बाजू सोडून चक्क एसटी बसच्या समोर आली. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने एसटीचा वेग कमी होता म्हणून अनर्थ टळला, अशी माहिती एसटीतील प्रवाशांनी दिली.
आता आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे; पण ज्यावेळी सुशासनाचा कार्यकाळ सुरू होता तेव्हा अशा विकासकामांत अडसर कुणी निर्माण केला होता? संतप्त नागरिकांनी आगपाखड करत टीकास्त्र सोडले. अशीच दूरवस्था संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गाव खेड्यापाड्यातील मतदारांच्या भेटीला उमेदवार जातील. त्यांना सुद्धा या खड्ड्यांचा त्रास होणार आहे. काही समाजसेवी संघटनांकडून ही समस्या मांडण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 25-10-2024