Tejas Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले!

Tejas Aircraft Crash: भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा भंयकर अपघात झाला. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला. हवाई कसरती सादर करण्यासाठी तेजस हवेत झेपावले होते.

मात्र, काही क्षणातच ते खाली कोसळले. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग आणि धुराचे लोळ उठले.

दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली.

भारतीय हवाई दलाने तेजस विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळवत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबई एअर शो-२५ दरम्यान कोसळले आहे. अधिकची माहिती घेतली जात आहे. काही वेळाने आम्ही याबद्दलची अधिकची माहिती देऊ, असे भारतीय हवाई दलाचे प्रवक्त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 21-11-2025