कोंडगाव येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील काजळी नदीशेजारी असणाऱ्या मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त दिनांक २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दिनांक २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ वाजता प्रवचन, दिनांक २६ ते २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६:३० वाजता कीर्तन, २५ ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत ऋग्वेद षडंग पारायण व पवनाम घनपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ८:३० वाजता नैमितिक उपासना व रोज रात्री ८:३० वाजता महाप्रसाद देण्यात येणार आहे.

तसेच ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता दीपप्रज्वलन, ध्वज पूजन, ४ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता जन्मोत्सव कीर्तन, ५ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० ते ३ समाराधना, रात्री १०:३० वाजता विशेष सांगितीक कार्यक्रम होणार आहे. तसेच उत्सव कालावधीत पहाटे ५ ते ६:३० वाजता काकड आरती होणार आहे. ६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता लळीताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त देवस्थान कोंडगाव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:08 PM 22-Nov-2025