क्रिकेटची राणी स्मृती मानधनाच्या घरी लगीनघाई..

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू, सांगलीची कन्या स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
विवाह सोहळा येत्या रविवारी सांगलीमध्ये पार पडणार आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या हळदीच्या कार्यक्रमावेळी महिला खेळाडूंनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

स्मृतीचा होणारा पती पलाश याची देखील दमदार एन्ट्री आज या ठिकाणी झाली. ढोल ताशाच्या निनादात त्याचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या विवाह सोहळ्यासाठी महिला क्रिकेट संघातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या हळदीच्या कार्यक्रमावेळी महिला खेळाडूंनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

विवाह सोहळ्यासाठी सांगलीतील मानधना यांच्या फार्म हाऊस वर जोरदार तयारी सुरू आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या हळदीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 22-11-2025