रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आज पदवीधर शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंदराव देसाई, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, नियामक मंडळ सदस्य श्री. मनोज पाटणकर व डॉ. संजय केतकर, लाइफ मेंबर बोर्ड अध्यक्ष प्रा. महेश नाईक, वैभवी लक्ष्मी ब्लड बँक समन्वयक श्री. अजय भिडे, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, श्रीमान भागोजीशेठ विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, लाइफ मेंबर बोर्ड बोर्ड सदस्य श्री. राजेश आयरे, सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सर्व मान्यवर यांना नोंदणी प्रक्रिया, तपासणी प्रक्रिया, समुपदेशन सेल, रक्तदानाची प्रक्रिया, विश्रामिका, सॅक्स व्यवस्था, कार्ड व प्रमाणपत्र वितरण व्यवस्था या सर्व बाबतींची माहिती शिबिर समन्वयक प्रा. स्नेहा पेवेकर, सदस्य प्रा. सीमा फळणीकर, प्रा. योगेश हळबे, प्रा. केतन नाईक, प्रा. प्रार्थना सावंत यांनी दिली. सुवर्ण महोत्सवानिमित्त समाज उपयोगी रक्तदान शिबिर या उपक्रमाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कौतुक केले.
यावेळी प्राध्यापक वर्ग, रक्तदानाकरिता इच्छुक रक्तदाते, माजी विद्यार्थी, सेवक वर्ग इ. उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:12 PM 22-Nov-2025














