Ratnagiri : रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक देणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक देत अपघात करुन पळालेल्या अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार २२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. सुमारास गोडबोले स्टॉप ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील ओमेगा दुकानासमोर घडली.

याबाबत प्रज्ञा वामन नागवेकर (रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री प्रज्ञा नागवेकर या ओमेगा दुकानातील आपले काम संपवून घरी जात होत्या. त्या दुकानाबाहेर पडून रस्ता ओलांडत असताना गोडबोले स्टॉप ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरुन एक अज्ञात चालक आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एवाय-५०१६) घेऊन भरधाव वेगाने येत होता. तो ओमेगा दुकानासमोर आला असता त्याच्या दुचाकीची धडक नागवेकर यांना बसली. यात त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईला, नाकाला तसेच डाव्या ढोपराखाली दुखापत झाली आहे. हा अपघात होताच अज्ञात चालकाने फिर्यादीला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता व न थांबता पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 24/Nov/2025