राजापूर : तालुका आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी तालुक्यामध्ये ११५ आरोग्य पथके गठित करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत लोकांशी संवाद साधताना घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये दीड लाख लोकांपैकी आजपर्यंत ४२ हजार ३७६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अद्याप एकही कुष्ठरुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
या मोहिमेमध्ये सर्व गावांसह विशेषतः जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे असा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कुष्ठरोग शोध मोहिम, तपासणी, सर्व्हेक्षण सुरू राहणार असून त्याला लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य विभागातर्फे केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 24/Nov/2025














