रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील खाडीकिनारी मद्यपान करणाऱ्या प्रौढांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद भालचंद्र खेऊर (वय ५५) असे संशयिताचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी मालगुंड खारभूमी मैदानाशेजारील खाडीकिनारी झुडपाजवळ निदर्शनास आली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 24/Nov/2025














