पावस : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील जाकादेवी देवस्थान येथे देवदिवाळीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव उत्साहात झाला. यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली.
शुक्रवार (ता. २१) सकाळी नित्यपूजा करण्यात आली. ७ वा. देवदिवाळी यात्रोत्सवानिमित्त जाकादेवी देवस्थानच्या देवदर्शनासाठी रीघ लागली होती. दुपारी १२.३० ते ३ वा. खिचडी प्रसादाचे वाटप केले. सायंकाळी नित्यपूजा आरती, भोवत्या, रात्री १०.३० वाजता स्थानिक गोताडवाडी येथील नमन झाले. शनिवारी (ता. २२) सकाळी नित्यपूजा आरती, ११ वा. सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी १ वाजता हळदी-कुंकू समारंभ झाला. रात्री आंधळा मागतो डोळा, हे विनोदी नाटक झाले. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी, जाकादेवी मुंबई मंडळ यांनी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 24/Nov/2025














