General Election : देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी ७० उमेदवार रिंगणात

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील निवडणुकीसाठी नगरपंचायत माघारीनंतर नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवकपदाच्या सात अशा एकूण आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवकपदासाठी ६५ असे एकूण ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी आणि १७ प्रभाग असे मिळून १८ जागांसाठी तब्बल ७० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने थंडीच्या काळात देवरुखातील राजकीय वातावरण तापले आहे. माघारीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार प्रचाराची राळ उडवण्यास सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देत प्रचार सुरू केला आहे

नगराध्यक्षपदासाठी श्रेया संतोष केदारी (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. नगरसेवकपदासाठी प्रभाग २ मधून संतोष कृष्णा केदारी (अपक्ष), प्रभाग १० मधून सूरज सतीश रेडीज (अपक्ष), प्रभाग ३ मधून अर्चना विकी कदम, प्रभाग १६ मधून सुभाष बारक्या कोटकर, वसंत रामचंद्र तावडे, मनोज लाल्या तावडे, अजय विजय गजबार या सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपच्या मृणाल शेट्ये, महाविकास आघाडीकडून उबाठाच्या सबुरी थरवळ, आपकडून दीक्षा खंडागळे, अपक्ष स्मिता लाड व अपक्ष वेदिका मोरे असे एकूण ५ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 24/Nov/2025