रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. पर्यंत ‘सागर कवच अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात रत्नागिरी पोलिस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरीज विभाग, समुद्र किनाऱ्यावरील खासगी बंदरे, जेट्टी आस्थापना सहभागी झाल्या होत्या.
हे अभियान भारतीय तटरक्षक दलाकडून एकाचवेळी महाराष्ट्र व गोवा राज्यात राबवण्यात आले. या अभियानादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ शत्रू पक्ष (टेड फोर्स) कडून एक घुसकोर टीम बोटीद्वारे रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने पाठवण्यात आली होती. बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) कडून ‘आई लाभ-लक्ष्मी’ या ट्रॉलर बोटने पेट्रोलिंग दरम्यान लाईट हाऊस रत्नागिरी समोरील अरबी समुद्रात ३.५ नॉटिकल मेल अंतरावर टेड फोर्स (शत्रू पक्ष) ‘नवदुर्ग’ नावाची बोट संशयास्पद फिरताना पकडण्यात आली, ब्ल्यू फोर्स दलाने बोटीवर चढून चौकशी केली, या बोटीवर संशयित ६ इसम मिळून आल्याने बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झाली.
या अभियानाचा उद्देश सागरी मार्गाने होणाऱ्या घुसखोऱ्या व आतंकवादी कारवाई रोकणे, तसेच सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची खबरदारी व युद्धजन्य परिस्थितीत प्रतिसाद यांचा सराव करणे व किनारपट्टी सुरक्षेसंबंधी सर्व सागरी घटकांना प्रशिक्षण देणे व सागरी सुरक्षा घटकांमध्ये समन्वय साधणे, (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झाली. या अभियानात पोलीस अधिकारी ४८, पोलीस अंमलदार ४६४, होम गार्ड, सुरक्षा वार्डन ४७, सागर रक्षक दल सदस्य ४१, पोलीस पाटील ६८, एन.सी.सी कॅडेट ४४, एन. एस. एस विद्यार्थी ४०, सहभागी झाले होते. तसेच यात अधिग्रहीत ट्रॉलर २ आणि या अभियानादरम्यान एकूण ४,७८७विविध वाहने तपासण्यात आली, ९,७८९ व्यक्ती तपासण्यात आल्या. समुद्रातील विविध ८० बोटी व या बोटीवरील ९६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 24/Nov/2025














