खेड मध्ये नॅशनल फार्मसी वीक निमित्त रॅली

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय बोरज यांच्या वतीने, खेड शहरातून नॅशनल फार्मसी वीक निमित्त औषधनिर्मिती करणारे व औषधविक्रेते यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते

या रॅली मध्ये सुमारे १२० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. रॅली ची सुरुवात संस्था प्रतिनिधी श्री अरविंद तोडकरी व गव्हर्निंग काऊन्सिल चेअरमन श्री अनील शिवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली, सदर रॅलीस सेक्रेटरी श्री माधव पेठे, सदस्य श्री पेराज जोयसर, श्री प्रफुल्ल महाजन, पब्लिक रिलेशन ऑफिसर श्री दीपक लढ्ढा,महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री रुपल पाटणे व रजिस्ट्रार श्री सितरामपंत जामकर उपस्थित होते.

रॅली च्या माध्यमातून फार्मसिस्ट व त्यांनी आजपर्यंत केलेल्या आरोग्यसेवेतून समाजाप्रतीचे समर्पण व सेवाभाव याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व फार्मसी व्यवसायाबद्दल जनजागृती तसेच जनसामान्यांपर्यंत औषधनिर्माण शास्त्र (बी फार्मसी) याबद्दल ची माहिती प्रसारित करण्यात आली व स्वस्त औषधांचा प्रचार प्रसार याकरिता रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली आयोजनासाठी महाविद्यालय प्राध्यापक श्री पटवर्धन व इतर सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 25-10-2024