Margashrisha Ganesh Utsav : रत्नागिरी शहरातील खालची आळी मित्रमंडळाचा मार्गशीर्ष गणेशोत्सव सुरू

रत्नागिरी : शहरातील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला रविवारी २३ नोव्हेंबर रोजी दिमाखात प्रारंभ झाला असून शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबरपर्यंत तो चालणार आहे. मंडळाचे यंदाचे हे ४२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने मंडळाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार २५ रोजी सकाळी ९ वाजता श्रींची पूजा व आरती होईल.

सायंकाळी ४ वाजता आवर्तनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता श्रीरंग वितरण होईल. गुरुवार २७ रोजी नाट्य संस्था सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हळदी-रत्नागिरी निर्मित कुंकू होईल. रात्री ८ वाजता कराओके नाईट, तुफान विनोदी नाटक विविध गुणदर्शन, बक्षीस सभारंभ होईल ‘लव लग्न-लोचा’ हे नाटक होणार आहे. बुधवारी २६ रोजी नित्य पूजा व आरती नंतर श्री सत्यविनायक पूजा व दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ८ वाजता महिलांचा आवडीचा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर बक्षीस समारंभ होईल. शुक्रवार २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्रींची ढोलताशांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. कौशल सर्व्हिसींग रॅम्पच्या प्रांगणात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना गणेशभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष किरण गांगण, उपाध्यक्ष वीरेंद्र गाडेकर आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 25/Nov/2025