Rahul Pandit | राजापुरात महायुतीचाच नगराध्यक्ष निवडून येईल : राहुल पंडित

राजापूर : गेले वर्षभर आमदार किरण सामंत यानी राजापुरात लावलेला कामांचा धडाका व त्यातून झालेली विकासकामे आणि महायुतीतील एकजूट यामुळे राजापूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. नगराध्यक्षपदासह महायुतीचे सर्व नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यानी व्यक्त केला.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात महायुतीचा मेळावा पार पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंडित यांनी हे सुतोवाच केले आहे. यावेळी आमदार किरण सामंत, भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांच्या एक वर्षाच्या कारकीर्दीत शहरात झालेली विकासकामे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची झालेली उकल यामुळे शहरात आमदार सामंत व महायुतीच्या पाठीशी इथला मतदार नक्कीच राहील, असा विश्वास राहुल पंडित यानी व्यक्त केला. भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी भाजपमध्ये कोणीही नाराज नसून परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल, असे सुतोवाच केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 25/Nov/2025