संगमेश्वर : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावाला भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
बचत गटातील महिलांनी श्रमदान करून श्रीमती रानडे यांच्या उपस्थितीत विजय बंधाऱ्याची बांधणी केली. याबाबत बचत गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी विशेष कौतुक केले. आंबेड बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सप्टेंबर २०२५ पासून केलेल्या कामाची माहिती घेतली.
ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती संजीवनी गवंडी यांनी गावात घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सरपंच सुहास मायगडे, उपसरपंच शोएब भाटकर यांनी अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अभियान यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 25/Nov/2025














