दापोली : तालुक्यातील जालगाव लष्करवाडी परिसरात घरफोडीची घटना २१ नोव्हेंबरला दुपारी घडली. कुटुंबीय घराबाहेर असताना उघड्या दरवाजाची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल १२ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला व त्यांचे कुटुंबीय २१ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ ते सायंकाळी ४.३० या वेळेत बाहेर गेले होते. घाईघाईत घराचा दरवाजा न लावल्याने तो उघडाच राहिला. याच वेळेत अज्ञात चोरटा थेट घरात शिरला आणि किचनमधील लोखंडी कपाट फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज घेऊन फरार झाला. २ लाख ५० हजार रुपये रोख, ९ लाख ६० हजाराचे दागिने (सुमारे १० तोळे ५ ग्रॅम) असा एकूण १२ लाख १० हजारांचा माल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी २२ नोव्हेंबरला दुपारी ३.५० वाजता तक्रार नोंदविण्यात आली. दरवाजा उघडा ठेवल्याने चोरट्याने संधी साधल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 25/Nov/2025














