Ayodhya Ram mandir: राम मंदिराच्या शिखरावर भगवा!

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (२५ नोव्हेंबर २०२५) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आला.

यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.

मोदी म्हणाले की, “हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही, तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्वज आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, ‘ओम’ शब्द आणि कोविदार वृक्ष हे सर्व रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे, एक यश आहे, निर्मितीसाठी संघर्षाची कथा आहे आणि १०० वर्षांच्या संघर्षाचे भौतिक रूप आहे.” पंतप्रधानांनी हा ध्वज केवळ वर्तमान क्षण नव्हे, तर भारताच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि रामराज्याच्या आदर्शांसाठी प्रेरणास्रोत राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की,”येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज भगवान रामाच्या मूल्यांचा प्रचार करेल. सत्य हेच धर्म आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 25-11-2025