Ratnagiri : मिरकरवाडा बोटीवरील खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : मिरकरवाडा बोटीवरील खलाशाचा थंडी भरून आल्याने आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास घडली. जुम्मन लबरी थारू (४७, रा. कैलाला, नेपाळ) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे.

याबाबत बोट मालक लियाकत मस्तान यांनी खबर दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या बोटीवर थारू हा कामाला होता. २३ नोव्हेंबर रोजी जयगड ते मिरकरवाडा येत असताना जुम्मन थारूने बोटीवर आंघोळ केली. त्यावेळी त्याला थंडी भरून आल्याने तो थरथर कापू लागला. खबर देणार यांनी मिरकरवाडा येथे बोट आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 26/Nov/2025