Ratnagiri : बेदरकारपणे टेम्पो चालवून पादचाऱ्यास धडक; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे टेम्पो चालवून पादचाऱ्याला धडक देत अपघात प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वा. रत्नागिरीत ते कोल्हापूर रस्त्यावर गयाळवाडी येथे घडली आहे.

याबाबतची तक्रार दीपक यशवंत केळकर (४९, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. गुरुवारी पहाटे ४ वा. ते कुवारबाव ते खेडशी जात होते. गयाळवाडीच्या पुढील टेम्पो (एमएच-०८-पी-७२८७) वरील चालकाने फिर्यादीला धडक दिली. यात त्यांच्या उजवा हात, कपाळ, डाव्या बाजूच्या बरगड्यां व दोन्ही पायांना किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर चालकाने न थांबता पळ काढला. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 26/Nov/2025