Ratnagiri Police | पोलिस दलाची सोशल मीडिया लॅब सुरू

रत्नागिरी : पोलिस दलाच्या ‘सोशल मीडिया लॅब’ चे २४ नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस निरीक्षक बी. बी. महामुनी तसेच इतर पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

या पोलिस ‘सोशल मीडिया लॅब’ द्वारे सोशर मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर त्वरित कारवाई करण्यास ही लॅब महत्त्वाची ठरणार आहे. तसेच या लॅबचा उपयोग प्रॉडक्टिव्ह पोलिसिंगसाठी करण्यात येणार असून, सोशल मीडिया ट्रेंडचा मागोवा घेऊन भविष्यात घडू शकणाऱ्या गुन्ह्यांचा अंदाज घेण्यासाठीही याचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक व सतर्ककतेने करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्वांना केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 26/Nov/2025