भाजपा निवडणूक संचलन समिती कोकण विभाग प्रमुखपदी शिल्पा मराठे यांची निवड

राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, नगरपंचायत, महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचलन समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या कोकण विभाग प्रमुखपदी येथील सौ. शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली आहे.

सौ. मराठे या भाजपाच्या महिला प्रदेश कमिटीच्या सरचिटणीसपदी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कोकण विभाग निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपविण्यात आल्याबद्दल सौ. मराठे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांना धन्यवाद दिले आहेत. या निवडीबद्दल सौ. मराठे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 26/Nov/2025