लांजा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लांजा तालुका शाखेने गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांची बुधवारी भेट घेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात ही भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विमल चव्हाण, लिपिक पत्याणे, विषयतज्ज्ञ पेंडखलकर उपस्थित होते.
या भेटीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघान २६ ऑक्टोबर रोजी पदवीधर वेतन त्रुटीबाबत पत्र दिले होते, त्यादृष्टीने कार्यवाही याबाबत विचारणा करण्यात आली. एकूण ८९ पदवीधरांपैकी १५ पदवीधर शिक्षकांची सर्व्हिस बुके पूर्ण झाली असून, उर्वरित शिक्षकांची सर्व्हिस बुक अपडेट करणे बाकी आहे. मात्र पदवीधर वेतन त्रुटीचे काम लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली. यावर २० डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
तसेच जितकी मागणी आहे तेवढेच धान्य देण्यात यावे व पुरवठादाराने वेळेत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. यासंबंधी पुरवठादाराला सूचना व त्यासंबंधी निर्देश दिले आहेत, असे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, नंदकुमार पाटोळे, विभागीय अध्यक्ष मुस्तकीन पटेल, दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विलास गोरे, सचिव बळी सोळंकी, काशिनाथ घाणेकर, नानासाहेब गोरड, बाळू नागरगोजे, संजय पवार, संदीप निखार्गे, प्रवीण सावंत, प्रजाप माने, उमेश केसरकर, दिलीप चव्हाण, प्रभाकर तांबे, विजय कदम, लिम्गन्ना भुसनूर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 26/Nov/2025














