खेड : खेड जेसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ ऑक्टोंबर रोजी साधना एक्झिकेटिव्ह दापोली येथे पार पडली. सदर सभेप्रसंगी खेड जेसीआय चे २०२५ साठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्ष पदी जेसी अमर दळवी तर सचिव पदी जेसी कपिल कोळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुक अधिकारी म्हणून आयपीपी जेसी प्रथमेश खामकर, जेसी अमोल दळवी, जेसी गणेश राऊत, जेसी पराग पाटणे, जेसी प्रियेस तलाठी यांनी काम पहिले खेड जेसीआय चे सर्व माजी अध्यक्ष, सभासद हजर होते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सचिव यांचे अध्यक्ष जेसी संकेत आपिष्टे यांनी स्वागत केले लवकरच पदग्रहण सोहळा आयोजित करुन पुढील २०२५ वर्षे ची सुत्रे नवीन कार्यकारिणीकडे सुपूर्द केली जातील आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 25/Oct/2024













