Congress Party’s | लियाकत शाह यांच्यासह काँग्रेसचे तिघे निलंबित

रत्नागिरी : चिपळूण पालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमधील तीन सदस्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

चिपळूण येथील निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये लियाकत सतार शाह, तुळशिराम दत्ताराम पवार आणि राजेंद्र भुरण यांचा समावेश आहे. हे तिन्ही नेते चिपळूण येथील आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, आपले हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे. त्यामुळे आपणास काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. पक्षाने शिस्तभंग करणाऱ्यांवर कोणतीही नरमाई न दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 27/Nov/2025