देवरूख : मुंबई विद्यापीठात सोमवार दि. २४ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रीडेशनने (एन बी ए)’ महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित केलेल्या “आउटकम बेस्ड् एज्युकेशन अँड अॅक्रीडेशन” या कार्यशाळेसाठी देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरली.
चित्रासारखी दिसायला साधी व सोपी, परंतु आकर्षक वाटणारी ही रांगोळी साकारायला कठीण असते. या रांगोळीत शुभ्र सनमाइका सारख्या पृष्ठभागावर असणाऱ्या रंगाचा वापर करण्यात आला असून, यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन, एन. बी. ए., दिल्ली व मुंबई विद्यापीठ असे तीन लोगोंसह राजाबाई टॉवरची छोटी व सुबक प्रतिकृती आणि यासोबतच्या उत्तम सुलेखनाने दर्शकांचे लक्ष वेधले. श्री. विलास रहाटे यांच्या या आशयपूर्ण रांगोळी कलाकृतीचे अनेक मान्यवरांनी कौतुक करून शाब्बासकी दिली. या वर्कशॉपचे आयोजन एन. बी. ए., दिल्ली, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांनी संयुक्तपणे केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 27/Nov/2025














