◼️ सामंतांच्या प्रत्येक वाक्याला लाडक्या बहिणी वाजवत होत्या आनंदाने टाळ्या
रत्नागिरी : महायुती सरकारने राबवलेले लाडकी बहीण योजना किती लोकप्रिय ठरली याचा प्रत्यय आज आला. रत्नागिरी विधासभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दखल केला. यावेळी तालुक्यातील लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. सुमारे २० हजार लाडक्या बहिणी उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या.

रत्नागिरीत ७५ हजार महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. रत्नागिरी तालुक्यात महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक आहे. सामंत यांच्या सभेमध्ये प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद देताना या लाडक्या बहिणी दिसत होत्या. या योजनेचा फायदा उदय सामंत याना नक्की मिळेल, असे आता बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 25-10-2024














