मेष- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल.
निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल.
वृषभ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी – व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील.
मिथुन- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील.
कर्क- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल.
सिंह- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज पती – पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे.
कन्या- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल.
तूळ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल.
वृश्चिक- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते.
धनु- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल.
मकर- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत.
कुंभ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल.
मीन- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. स्वकियांशी मतभेद संभवतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 28-11-2025














