उत्तर भारतातून पुन्हा थंड वाऱ्याला सुरुवात; गारठा वाढणार

मुंबई : उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे.

मुंबईचे किमान तापमान १७, तर राज्यभरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत थंडीची शक्यता आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यासह लगतच्या परिसराचा समावेश असेल; तर मराठवाड्यातही पारा खाली उतरणार आहे. २ ते ३ डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहील. उत्तर कोकणातही सकाळी किमान तापमानाचा पारा खाली येईल.

नागपूरचे किमान तापमान १३.६
विदर्भात थंडी परतली असून, शुक्रवारी नागपूरचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे मागील २४ तासांत ४ अंशांनी कमी झाले आहे. भंडाऱ्याचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला; तर गोंदियाचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 29-11-2025