Horoscope: आजचे राशीभविष्य – २९ नोव्हेंबर २०२५

मेष – आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.

वृषभ – तो आपल्या राशी पासून दशम भावात असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख – शांती मिळेल.

मिथुन – आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी – व्यवसायात सुद्धा प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल.

कर्क – आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या – पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील.

सिंह – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी – व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल.

कन्या – आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल.

तूळ – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद – विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही.

वृश्चिक – आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे.

धनु – आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल.

मकर – आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल.

कुंभ – आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र – कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या कडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील.

मीन – आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 29-11-2025