Election 2025 : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या ‘काही मतदारसंघाती’ल सार्वजनिक सुट्टी रद्द

मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मतदारसंघ म्हणजे जिथे आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत तिथे सुट्टी कायम आहे. फक्त ज्या मतदारसंघाच्या निवडणुका सध्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यांना सुट्ट्या मिळणार नाहीयेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 02/Dec/2025