रत्नागिरी : छोटू देसाई अॅकॅडमीतर्फे हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी : जिल्ह्यातून उत्तम व दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत, अशा एकमेव उद्देशाने येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे शालेय मुला-मुलींसाठी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण हे सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी असून सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात सुरू राहणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक बावा चव्हाण, रत्नागिरीतील प्रशिक्षक हरिश लाडे व साईप्रसाद एरम, विश्वनाथ लिंगायत, सुभाष पटवर्धन, अक्षय कोळंबेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुंबई व पुणे येथील माजी रणजीपटूदेखील खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात क्रिकेटचे आधुनिक तंत्र शिकवण्यावर व फिटनेसवर भर दिला जाणार आहे. या शिबिरात भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांनी रविवारी सकाळी सात वाजता मारूती मंदिर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर युनिफॉर्ममध्ये उपस्थित राहावे. याबाबत माहितीसाठी अॅकॅडमीचे सचिव दीपक देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 25-10-2024