गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी १७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नगराध्यक्ष निवडणुकीची लढत चौरंगी, तर नगरसेवकपदाच्या १७जागांसाठी ४० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण १७ मतदान केंद्रे असून ५ हजार ९६१ एकूण मतदार आहेत. यामध्ये २ हजार ८५६ पुरुष, तर ३ हजार १०५ स्त्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्र प्रभागनिहाय पुढीलप्रमाणे- ४ प्रभाग क्र. १मध्ये एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडी बाग, प्रभाग क्रमांक २ जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं.१, प्रभाग क्रमांक ३ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं. २, प्रभाग मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं. १ (नारायण मंदिर शेजारी), प्रभाग ५ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं.२ (नारायण मंदिर शेजारी), प्रभाग ६ मध्ये श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर, प्रभाग ७ मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर, प्रभाग ८ मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर, प्रभाग ९ मध्ये ग. वा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर, प्रभाग १० मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर, प्रभाग १२ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं. १, प्रभाग १३ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं. १, प्रभाग १४ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं. १, प्रभाग १५ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर, प्रभाग क्रमांक १६ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर, प्रभाग १७ मध्ये अंगणवाडी खोली गुहागर जांगळेवाडी आदी मतदान केंद्रांवर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 02/Dec/2025














