डॉ. अनिकेत मयेकर याना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान

पावस : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतेर्फे वाड्मय पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कोकणातील हर्चे गावचे सुपुत्र डॉ. अनिकेत मयेकर यांना त्यांच्या ‘स्टेथोस्कोप’ या ललित लेख संग्रहासाठी स्व. अनुराधा नंदुरकर स्मृती प्रित्यर्थ प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी होते.

ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते डॉ. अनिकेत मयेकर यांच्यासह इतर पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील सर्वोत्कृष्ट लेखकांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्यवाह विनीता रेणपुरे, सहकार्यवाह संजय जगताप, कोषाध्यक्ष विजय नाईक आदींनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 02/Dec/2025