Indian Railway Mega Bharti : भारतीय रेल्वेत ८०५० जागांची नवीन मेगा भरती जाहीर; जाणून घ्या अर्जाची शेवट तारीख

Indian Railway NTPC Mega Bharti 2025: भारतीय रेल्वेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी करण्याचे स्वप्न तुमचं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून मेगा भरती जाहीर झाली आहे.

RRB NTPC 2025 अंतर्गत देशभरातील विविध विभागांमध्ये Non-Technical Popular Categories या गटात एकूण ८०५० पदे भरती करणार आहेत. या भरतीसाठी पदवीधर तसेच पदवीपूर्व उमेदवार देखील अर्ज करू शकतात. NTPC Graduate (पदवीधर) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० नोव्हेंबर आहे तर NTPC Under Graduate (पदवीपूर्व) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर होती मात्र याची तारीख वाढवल्याने आता इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

पदांची माहिती
NTPC – Graduate (पदवीधर) ५०००
NTPC – Under Graduate (पदवीपूर्व) ३०५०
एकूण – ८०५०

RRB NTPC 2025 साठी अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत RRB NTPC जाहिरात काळजीपूर्वक वाचाळ अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकृत केले जातील. ऑनलाइन फॉर्म योग्य प्रकारे भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची अपलो प्रत जोडावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 02/Dec/2025