Lanja Municipal Councils and Nagar Panchayat : लांज्यात नगराध्यक्ष व नगरसेवकच्या पदासाठी ७१.०४ टक्के मतदान

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळ सत्रात मतदारांचा निरुत्साह होता. मात्र, दुपारपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदानास गर्दी होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७१.०४ टक्के इतके मतदान झाले.

नगराध्यक्षपदाच्या तीन आणि नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ५७ अशा एकूण ६० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३२.६० टक्के मतदान झाले होते. ४ हजार ६४० मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये २ हजार ५५९ पुरुष व २ हजार ८१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लांजा आगरवाडी मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठी गर्दी होती. सायंकाळपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होईल, असा अंदाज खरा ठरला. दुपारी मतदानाची टक्केवारी वाढली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 03/Dec/2025