Maharashtra Police Bharti 2025 Update : पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Police Recruitment 2025 : महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पोलीस दलात दाखल होण्याची इच्छा असते. जर तुमचे देखील पोलीस होण्याचं स्वप्न असेल आणि अद्याप देखील अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ मधील अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या भरतीत १५,६३१ पद भरले जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरु झाली असून शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर होती पण आता मुदतवाढ झाली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 वरून वाढवून ७ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. यासोबतच, अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

अर्ज सादर करण्यात अडचण आलेल्या उमेदवारांसाठी ही खरोखरच मोठी सुवर्णसंधी आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी policerecruitment2025.mahait.org किंवा mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन अर्ज भरावा.
पदांची माहिती

पोलीस कॉन्स्टेबल: 12,399

पोलीस कॉन्स्टेबल चालकः 234

जेल कॉन्स्टेबल: 580

SRPF कॉन्स्टेबल: 2,393

पोलीस बँड्समन 25

पात्रता

-शिक्षण : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण

-वय : 18 ते 28 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)

राष्ट्रीयत्व : भारतीय नागरिक

शारीरिक पात्रता : शासनाने निश्चित केलेल्या शारीरिक चाचण्या आवश्यक (PET/PST)

अर्ज शुल्क

General / Open वर्ग : 450

Reserved Categories: 350

शुल्क केवळ ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाईल.

निवड प्रक्रिया

शारीरिक पात्रता चाचणी (PST/PET)

लेखी परीक्षा

कौशल्य चाचणी (Skill Test) – लागू असल्यास

कागदपत्र तपासणी व वैद्यकीय चाचणी

अर्ज कसा करावा?

अधिकृत पोर्टलला भेट द्याः

policerecruitment2025.mahait.org

“नवीन नोंदणी” पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा

लॉगिन करून अर्ज फॉर्म उघडा वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरा अर्ज सबमिट करून प्रिंट आउट घ्या

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 03/Dec/2025