गणपतीपुळेत पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील एका हॉटेलवर उतरलेला पर्यटक पोटदुखीने आजारी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांत मधुकर आठवले (वय ५३, रा. २५ दिव्यज्योती सीएचएस शास्त्रीनगर रोड, नं. २ गोरेगाव-मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 04/Dec/2025