Ratnagiri : गावडे आंबेरेत हातभट्टीच्या दारू विक्रीवर छापा

पावस : तालुक्यातील कापूसतळी गावडे-आंबेरे येथे विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार २० रुपयांची २० लिटर दारू जप्त केली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाराम धकटू गोरे (वय ७४, रा. हर्चे गोरेवाडी, रत्नागिरी, सध्या रा. कापूसतळी, गावडेआंबेरे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी कापुसतळे गावडेआंबेरे येथे निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडे विनापरवाना २ हजार रुपयांची २० लिटर दारू सापडली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 04/Dec/2025